सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट ही राष्ट्रीय सेवा भारतीची संलग्न संस्था आहे. सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टची स्थापना मे २०२४ मध्ये झाली.त्या पूर्वी संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती या नावे १९७३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात , विदर्भ सोडून सेवा कार्यात कार्यरत होती. सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट चे मुख्य कार्यालय वामनराव मुरांजन कॉलेज , नीलम नगर phase २ मुलुंड ईस्ट येथे आहे. येथे संस्थेचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र आहे.
संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर नोंदणी झालेली आहे व संस्थेला १२ए व १२जी ही प्रमाणपत्रे देखील आयकर विभागाकडून प्राप्त झालेली आहेत. संस्थेचे कार्य शेत्र हे गोव्यापासून मुंबई पर्यंत, नवी मुंबई,रत्नागिरी, पालघर व भिवंडी पर्यंत पसरलेले आहे.
राष्ट्रीय सेवा भारती चे मुख्य काम हे प्रशिक्षण,अध्ययन,जागरण व सहयोग हे आहे. व त्यामुळे सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट चा मुख्य भर हा प्रशिक्षणावर आहे.व त्यामुळे कोकण प्रांतामध्ये सध्या सुरू असलेल्या २६ संस्थांच्या निरनिराळ्या सेवा कार्यांना भेट देणे व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे हा संस्थेचा मूळ हेतू आहे.
सेवा भारतीचे मुख्य पाच आयाम आहेत
स्वास्थ्य:
a)या आयामामध्ये संस्थेची ८२ रुग्नोपयोगी साहित्य सेवा केंद्रे सुरू आहेत. या केंद्रारमार्फत गरजू रुग्णांना नाममात्र शुल्क घेऊन फौलर बेड, anchor बेड, व्हील chair,वॉकर,comode केअर,कुबड्या,स्टीक्स आदि साहित्य आवश्यक कालावधी साठी पुरविले जाते. काही केंद्रामार्फत ऑक्सिजन concentrator, traction किट, शव पेटिका रुग्णांना पुरविले जाते. या द्वारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक संस्थेशी जोडले जातात.
b) संस्थे तर्फे ८२० ग्राम आरोग्य रक्षक वेगवेगळ्या जिल्ह्यात नेमलेले आहेत. मुख्य रस्त्यापासून कोसो दूर खेड्यात अथवा डोंगरावर राहणाऱ्या आदिवासी व वनवासी बांधवांना सर्दी,खोकला,ताप,अंग दुखी, पोट दुखी,अपचन,उलटी आदि आजारांवर प्राथमिक औषध म्हणून आयुर्वेदिक गोळ्या दिल्या जातात. तसेच रुग्णांच्या जखमांवर प्राथमिक उपचार केले जातात. हे ग्राम आरोग्य रक्षक पावसाळ्यात पाणी स्वच्छ्ता, वृषारोपण, आरोग्य शिबीर अशी अनेक उपक्रम ग्राम स्थांच्या मदतीने राबवितात. आतापर्यंत हजारो रुग्णांनी ह्या उपक्रमांचा फायदा घेतला आहे. या ग्राम आरोग्य रक्षकांचे वेळोवेळी संस्थे तर्फे अभ्यास वर्ग घेतले जातात. जिल्हा आरोग्य केंद्रातून या सर्व ग्राम रक्षकांना औषध पुरवठा केला जातो . विविध कारणानं साठी माणसाला रक्ताची आवश्यकता असते. या साठी संस्था आरोग्य रक्त गट सूची तयार करणे, रक्त दात्यांची यादी करणे तसेच आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित करणे असे उपक्रम करत असते.
ग्रामीण भागाचा विचार करता कुपोषणाची समस्या फारच गंभीर असल्यामुळे ती सोडवण्यासाठी पूरक पोषण आहाराची योजना आपण काही पाड्यांवर राबवली आहे व त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
२) शिक्षा:
संस्थे तर्फे १०० जिल्हा परिषद , ग्राम पंचायत व अन्य शाळा मध्ये फिरत्या विज्ञान प्रयोग शालांमर्फत संस्थेचे एक शिक्षक 20 शाळा मध्ये जाऊन इयत्ता ५वी ६वी व ७ वी मधील विद्याथ्र्यांचे त्यांच्या अभ्यास क्रमातील प्रयोग प्रत्यक्ष करयुन घेतात व त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान ची व एकंदर अभ्यासाची गोडी लागते.या शाळां मधील विद्यार्थ्याची व्यक्तिमत्त्व शिबिरे आयोजित केली जातात व या शिबिरांची वैशिष्ट्ये म्हणजे या शिबिराला लागणारा खर्च व सर्व व्यवस्था शाळेचे माझी विद्यार्थी आपला अमूल्य वेळ देऊन उत्साहाने करतात.
३) सामाजिक स्वास्थ्य:
सेवा सहयोग,केशव सृष्टी अशा संलग्न संस्था मार्फत ठिकठिकाणी एकूण २२ संस्कार वर्ग चालवले जातात. या संस्कार वर्गांमर्फत विद्याथ्र्यांचा मानसिक व शारीरिक विकास केला जातो.या अभ्यास वर्गांमधून मुलांना संस्कार मिळतात व राष्ट्र प्रेमाची आवड निर्माण होते.तसेच किशोरी विकास वर्गां मार्फत मुली व त्यांचे कुटुंब यांच्याशी सुसंवाद साधला जातो. याशिवाय सेवा वस्त्यांमध्ये भारत माता पूजन , रक्षा बंधन, दही हंडी. सुपोशित भारत , व्यक्तिमत्त्व विकास शिबीर,
विज्ञान व सहल, मतदाता जागृती, व्यामशाला, दिव्यांग सहायता केंद्र आदि उपक्रम नागरिकांच्या मदतीने चालवले जातात. सेवा भारती संस्थेतर्फे एकूण १४२७ सेवा कार्ये चालवले जातात.
४) स्वालांबन :
वंचित, अभाव ग्रस्त, उपेक्षित या वर्गातील लोकांसाठी संस्था स्वलांबन शिबिरांचे आयोजन करते व
त्यामार्फत गरजूंना swalumbi करण्याचा प्रयत्न करते.
५) आपत्ती प्रबंधन:
अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पुर, चक्री वादळ , रोगाची साथ अशा वेळी संस्था पीडित लोकांना वस्तू रुपात, औषध रुपात मदत करते. तसेच रेस्क्यु ऑपरेशन सारखे प्रात्यक्षिक देखील घेते.
स्वामी विवेकानंद पुरस्कार हा असा पुरस्कार आहे की जो दरवर्षी एका विशिष्ट विषयात समाजपयोगी काम करण्याऱ्या तरुण व्यक्ती व संस्था यांना दिला जातो.व या वर्षीचा पुरस्कार संस्थे तर्फे dr दिपलिजिना देण्यात येत आहे